फुलंब्री प्रतिनिधी दि. 21
फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथील शेतकरी अब्दुल रहीम बुढन शेख (वय 55) यांच्या शेतातील सोलार प्लेट अज्ञात व्यक्तीने दगड मारून फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी त्यांनी वडोद बाजार पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, 20 जून 2026 रोजी दुपारी सुमारे 2 वाजेच्या सुमारास ते खामगाव शिवारातील गट क्रमांक 189 मधील शेतात गेले असता, शेतातील सोलार प्लेट फोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अज्ञात व्यक्तीने दगड मारून सोलार प्लेटचे नुकसान केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या घटनेमुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले असून संबंधित अज्ञात आरोपीचा शोध घेऊन त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.