header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

शहरानामा’च्या हेरिटेज वॉकमध्ये उलगडले ‘अवलोकितेश्र्वर’ शिल्पाचे सौंदर्य

छत्रपती संभाजीनगर, : छत्रपती संभाजीनगर शहरातील औरंगाबाद लेणी ही अत्यंत महत्त्वाची लेणी आहे. जगातील दोन अद्भुत शिल्प इथल्या लेणी क्रमांक सातमध्ये बघायला मिळतात. दुर्दैवाने या जगविख्यात वारसास्थळाची माहिती आपणच ठेवत नाही. शहराचे नागरिक, लहान मुल ही सुद्धा वारसास्थळांचे ब्रँड ॲम्बेसेडर असतात. आपणच आपल्या लेणीची माहिती इतरांना द्यायला हवी, असे आवाहन मुर्ती व शिल्प संशोधन संस्थेचे सचिव डॉ.संजय पाईकराव यांनी केले.

शहरातील ‘शहरनामा’ टीमने रविवारी आपला दुसरा हेरिटेज वॉक व फोटो वॉक डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाजवळ असलेल्या औरंगाबाद लेणी समूहातील क्रमांक ६ ते १० येथे घेतला. इतिहास व पुरातत्व विभाग, एमजीएम विद्यापीठ, आख्यान फाऊंडेशन, गरवारे कम्युनिटी सेंटर, रोटरी क्लब ऑफ छत्रपती संभाजीनगर ईस्ट आणि अॅडगाइड मीडिया प्रा. लि. व भारत पर्यटन विभाग यांनी मिळून हा उपक्रम घेतला. यावेळी गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतवणे, एमजीएम विद्यापीठाच्या इतिहास व पुरातत्व विभागाचे सहाय्यक प्रा. आशुतोष पाटील, अॅडगाइड मीडियाचे ओम परदेशी, रोटरी क्लब ऑफ छत्रपती संभाजीनगर ईस्टचे अध्यक्ष निवृत्ती गजभारे, भारत पर्यटन विभागाच्या वरिष्ठ अधिकारी स्नेहल पाटील उपस्थित होत्या.

डॉ. संजय पाईकराव यांनी औरंगाबाद लेणीचा इतिहास, कला, स्थापत्य आणि पुरातत्त्वीय वैशिष्ट्ये याकडे लक्ष वेधले. वारसा स्थळे समजून घेण्यासाठी त्यांच्या प्रेमात पडायला हवे. कलासक्त दृष्टीने बघितले तर औरंगाबाद लेणीतील शिल्प बोलकी वाटतात. औरंगाबाद लेणीचा उल्लेख कान्हेरीच्या लेण्यात येतो.‌ या लेणीचा कालखंड साधारणपणे सहावे ते आठवे शतक सांगितला जातो. बेसॉल्टमधले हे शिल्प वैभव वरून खाली कोरण्यात आले.‌ शिल्पातील आभूषणे, केशरचना अत्यंत कोरीव आहे. या लेणीतील काही शिल्प अजिंठ्याच्या शिल्पापेक्षाही सुंदर असल्याचे अभ्यासक म्हणतात. यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो तो लेणी क्रमांक सातमध्ये ‘अवलोकितेश्वर बोधिसत्व ‘ हे शिल्प. यामध्ये ‘अष्टभयां’पासून अवलोकितेश्र्वर बोधिसत्व रक्षण करतात अशी मान्यता आहे. अजिंठा, कान्हेरी, वेरूळ लेणींमधल्या अवलोकितेश्र्वरांपेक्षाही औरंगाबाद लेणीतील अवलोकितेश्वराचे शिल्प सर्वोत्तम मानले जाते. याच लेणीतील ‘राजनर्तिका नृत्यशिल्पपट’ म्हणून प्रसिद्ध आहे. या शिल्पाकृतीकडे अभ्यासक आकर्षित होत असून हे शिल्प अत्यंत प्रभावी व स्त्री स्वातंत्र्याला अभिव्यक्त करणारे आहे, लेणी क्रमांक सहाचा शोध ६० घ्या दशकात डॉ. रमेश गुप्ते यांनी लावला.‌ यास गणपती लेणी म्हटले जाते, असे संजय पाईकराव म्हणाले.

शहरनामाच्या पहिल्या फोटो वॉकच्या विजेत्या मिनल निकम यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. तसेच सुधीर कोर्टीकर यांनी वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज काढून दाखवले.‌

—————-

” औरंगाबाद लेणीतील अवलोकितेश्वर शिल्प हे संपूर्ण भारतातीलच सर्वोत्कृष्ट शिल्प आहे. इतका अद्भुत वारसा जवळ असतानाही या लेणीची म्हणावी तेवढी प्रसिद्धी मात्र होत नाही, हे वास्तव आहे. या लेणी वर इतर देशांतील अभ्यासक संशोधन करतात. इथे येताना या वारसा स्थळाची शिस्त व स्वच्छता राखली जावी याची काळजी घ्यायला हवी-

डॉ. संजय पाईकराव, सचिव, मुर्ती व शिल्प संशोधन संस्था

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90