header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

खुलताबाद शहरातील भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण व रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहिम

दैनिक हिंदू प्रकाश वार्ता

छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी खुलताबाद नगरपरिष दे मार्फत शहरातील भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवणे, नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेचे संरक्षण करणे तसेच रेबीजसारख्या संसर्गजन्य आजारांचा प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण (Animal Birth Control – ABC) व रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे.

सदर मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मा. मुख्याधिकारी  श्री समीर शेख  यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेमार्फत प्राणी जन्म नियंत्रण समिती गठित करण्यात आली असून संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष पथकही तयार करण्यात आले आहे. 

मोहिमेदरम्यान भटक्या श्वानांना प्राणी कल्याण नियमांचे पालन करून सुरक्षित व मानवीय पद्धतीने पकडण्यात येत असून त्यांचे निर्बिजीकरण व रेबीज प्रतिबंधक लसीकरण WVS HOPE जांभाळा ता.गंगापुर या संस्थे  मार्फ़त   करण्यात येत आहे. शस्त्रक्रियेनंतर आवश्यक उपचार व निरीक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधित श्वानांना त्यांच्या मूळ परिसरात सुरक्षितपणे सोडण्यात येत आहे.

आजपर्यंत नगरपरिषदेमार्फत एकूण ७१ भटक्या श्वानांचे यशस्वीरित्या निर्बिजीकरण व रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले असून ही मोहीम शहरातील उर्वरित भागांमध्येही टप्प्याटप्प्याने सुरू राहणार आहे.

खुलताबाद नगरपरिषद सर्व नागरिक, संस्था, आस्थापना व प्रतिष्ठानांना आवाहन करते की, सदर मोहिमेस पूर्ण सहकार्य करून शहर स्वच्छ, सुरक्षित व रेबीजमुक्त ठेवण्यासाठी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90