header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

अभिजीत दीपके यांनी तथ्यांऐवजी दिशाभूल करू नये; हिंसाचाराचे समर्थन अयोग्य : किशोर शितोळे

दिल्लीतील आंदोलनातील दगडफेकप्रकरणी कायदेशीर कारवाईला विरोध का, असा सवाल

हिंदू प्रकाशवार्ता प्रतिनिधी 

छत्रपती संभाजीनगर : दिल्लीतील आंदोलनादरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप करणारे अभिजीत दीपके यांनी तथ्यांऐवजी दिशाभूल करू नये, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी केली आहे. संबंधित प्रकरणात दिल्ली पोलिस आरोपींचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करत असतील, तर त्या कारवाईला विरोध करण्याचे कारण काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

शितोळे म्हणाले की, आंदोलनादरम्यान पोलिस कर्मचारी आणि पत्रकारांवर झालेले हल्ले, दगडफेक आणि हिंसाचार हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. अशा घटनांमध्ये दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका घेण्याऐवजी आरोपींचे समर्थन केल्याचा आभास निर्माण करणारी विधाने अभिजीत दीपके करत आहेत.

हातात संविधान घेऊन बोलणाऱ्यांनी कायद्याचा सन्मान राखत हिंसाचार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी करणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता दिशाभूल करणारी भूमिका घेतली जात असल्याने त्यामागील हेतूबाबत जनतेच्या मनात प्रश्न निर्माण होत असल्याचेही शितोळे यांनी नमूद केले.

याशिवाय, अभिजीत दीपके काँग्रेसच्या भूमिकेशी सहमत नसतील, तर कर्नाटक आणि पंजाबमधील कथित पेपर लीक प्रकरणांबाबत संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी ते कधी करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आंदोलनादरम्यान झालेल्या घोषणाबाजी, शिवीगाळ आणि त्यानंतर झालेल्या कथित जल्लोषाबाबतही अभिजीत दीपके यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी केली.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90