महिना झाला तरी आंदोलनावर तोडगा निघालानाही.
आंदोलन करते मनपा कर्मचारी आक्रमक
हिंदू प्रकाश वार्ता / अशोक पवार
परभणी:- परभणी महानगरपालिका महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे गेली महिनाभरापासून आंदोलन चालू असून कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी विविध प्रकारचे आंदोलन करून मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करूनही आतापर्यंत आंदोलन चालूच आहे शहरासाठी अत्यंत महत्त्वाचे असणारी महानगरपालिका व त्यांचे कर्मचारी कर्मचाऱ्यांमुळे परभणी शहर स्वच्छ व सुंदर अबाधित राहू शकते पण त्याच कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या मागणीसाठी त्यांना 30 महिना महिना आंदोलन करावे लागते या आंदोलनाकडे परभणीकरांचे लक्ष वेधले असून कर्मचाऱ्यांच्या जीएसटी चे थकीत अनुदान मिळावे वेतन अदा करावी सेवानिवृत्ती उद्घाटन द्यावे या मागणीसाठी मागील महिनाभरापासून मनपा कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असून त्या आंदोलनाची कुठल्याही प्रकारचे दखल न घेता कर्मचारी संतप्त होऊन कर्मचाऱ्यांच्या संयमाचा बांध तुटला व आक्रमक होऊन9 सप्टेंबर रोजी रस्त्यावर कचरा टाकून मनपा आयुक्ताची गाडी अडवली व गेटला कुलूप लावले महापालिका कर्मचारी आंदोलनाकडे शासनाचे दुर्लभ होत असताना मनपा कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन अधिक तीव्र केले आहे आयुक्त नितीन नार्वेकर यांची गाडी अडवली परभणी प्रलंबित मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात अशा जोरदार घोषणाबाजी करत अचानक घडलेल्या प्रकारामुळे मनपा कार्यालयात परिसरात काही काळ तणावाचे वाचून दिसून आले गेल्या सहा महिन्यापासून वेतन नाही व त्यातच महिनाभरापासून आंदोलन चालू असल्याने कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून आंदोलन करूनही शासन या मागणीकडे डोळेझाक करत आहे म्हणून संत ठेवून कर्मचाऱ्यांनी आपल्या आंदोलन अधिकच तीव्र केले आहे.