header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

सोयगाव तालुक्यातील बनोटी येथे ३५ बालकाची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधी वाटप

https://hinduprakashwarta.com/wp-content/uploads/2026/06/IMG_२०२६०६१६_१६३७५६.jpg

सोयगाव,दि.१६ जून 

तालुक्यातील बनोटी येथे प्रकल्प कार्यालय व राष्ट्रीय बाल आरोग्य सुरक्षा अंतर्गत झालेल्या बाल आरोग्य तपासणी शिबिरात ३५ बालकाची आरोग्य तपासणी करून त्यांना  मोफत औषधी वाटप करण्यात आले. 

या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.खालिद झाकी यांनी सांगितले की जिल्हा शल्य चिकित्सक मुदखेडकर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.चावला व वैद्यकीय अधीक्षक खंदारे यांच्या मार्गदर्शनाने  कुपोषण कमी करण्यासाठी सर्वत्र आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. व बालकांना आरोग्य तपासणीनंतर संजय शहापूरकर यांच्या हस्ते मोफत औषधी वाटप करण्यात येणार आहे. 

त्या नंतर डॉ.अख्तरी पठाण यांच्या हस्ते बालकांना मोफत औषधी वाटप करण्यात आले. 

या प्रसंगी अंगणवाडी सेविका देवकन्या आसवाल,रत्ना जाधव,लताबाई वाघ,अनिता कुंभार,कविता शिंदे,सविता पाटील,जयश्री वाडेकर,सरिता पाटील,बेबी आधारे व मदतनीस उपस्थित होते. 

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90