हिंदू प्रकाशवार्ता/प्रतिनिधी
सोयगाव,दि.१८ जून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू पी एम यांनी गुरुवारी (दि.१८) सायंकाळी पाच वाजता अचानक जरंडी येथे भेट देऊन ग्रामपंचायतीने केलेल्या विविध नाविन्यपूर्ण कामांची पाहणी करून जरंडी छान असे उदगार काढले दरम्यान यावेळी त्यांनी हुतात्मा स्मारकात घनवन २५ हजार वृक्ष लागवडीची पाहणी करून हुतात्मा स्मारकात असलेल्या नंदनवन बागेत ऑक्सिजन पार्क कोरफड लागवड यांची ही पाहणी केली यावेळी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी आदी ठिकाणी भेटी दिल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त पदांची माहिती घेवून रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकारी पदी तातडीने पद भरण्याची आश्वासन दिले दरम्यान स्मशानभूमीत चक्क वीस मिनिटे मुख्य कार्यकारी अधिकारी रमल्या होत्या स्मशानभूमीत बोलके वृक्षलागवड पाहून त्या भारावून गेल्या होत्या यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके, गटविकास अधिकारी अमोल जगताप, सहायक गटविकास अधिकारी अशोक दौड,ग्रामपंचायत अधिकारी सुनील मंगरूळे, सरपंच स्वाती पाटील,संजीवन सोनवणे, अमृत राठोड, संतोष पाटील,सतिष बाविस्कर, अंबु राठोड ग्रामसेवक सुमित महाले आदींची उपस्थिती होती.