header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आर्य वैश्य कोमटी समाजातर्फे वृक्षारोपण

जिंतूर, प्रतिनिधी :

 आर्य वैश्य कोमटी समाजाचे नेते तथा महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (दि. ३०) आर्य वैश्य कोमटी समाजाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

जिंतूर येथील जालना रोडवरील वसंत शांती विहार परिसरात सकाळी १० ते ११.३० या वेळेत झालेल्या कार्यक्रमात विविध वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या उपक्रमात समाजातील ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला तसेच आर्य वैश्य महासभेचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.

यावेळी उपस्थितांनी वृक्षलागवडीबरोबरच त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प व्यक्त केला.  कार्यक्रम पावसाच्या सरीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90