header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

पडेगावच्या सफारी पार्कमध्ये वृक्षारोपण अन् विकासकामांचा आढावा; छत्रपती संभाजीनगरला हरित व सुंदर बनवण्याचा निर्धार!

हिंदू प्रकाशवार्ता प्रतिनिधी 

छत्रपती संभाजीनगर 

पर्यावरण संवर्धन, हरित वारसा जोपासणे आणि पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने छत्रपती संभाजीनगरमधील पडेगाव येथील सफारी पार्क परिसरात नुकताच वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, महापौर संजय राजूरकर, राजेंद्र जंजाळ आणि अनिल मकरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला असून, यादरम्यान पार्कमधील सुरू असलेल्या विविध विकासकामांची आणि उपलब्ध सुविधांची पाहणी करण्यात आली.

​छत्रपती संभाजीनगर शहराला हरित, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी प्रशासनाकडून विविध पावले उचलली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पडेगाव येथील सफारी पार्क परिसरात विशेष वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. “प्रत्येक वृक्ष हा निसर्गाचा अमूल्य ठेवा असून, त्याचे संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असा संदेश यावेळी उपस्थितांनी दिला. ​वृक्षारोपणानंतर सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, महापौर संजय राजूरकर, राजेंद्र जंजाळ आणि अनिल मकरिया यांनी सफारी पार्कमधील सुरू असलेल्या विविध विकासकामांची व पर्यटकांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. पर्यटकांना अधिक दर्जेदार सुविधा मिळाव्यात, परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा आणि हे पार्क एक आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून विकसित व्हावे, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

​यावेळी उपस्थित मान्यवरांनी विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. परिसर अधिक समृद्ध, सुशोभित आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली. एक हरित, सुंदर आणि विकसित छत्रपती संभाजीनगर घडविण्याच्या दिशेने प्रत्येक पाऊल दृढ संकल्पाने पुढे टाकले जात असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. 

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90