header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

सोयगाव तालुक्यात पुन्हा अठरा तास संततधार;-सोयगाव,धिंगापूर,बनोटी धरणे ओव्हरफलो; तीन पुल पाण्याखाली; सोयगाव तालुका

हिंदू प्रकाशवार्ता/प्रतिनिधी 

सोयगाव,दि.३१ जुलै 

सोयगाव सह तालुक्यात गुरुवारी( दि.३०)रात्री आठ वाजेपासून सुरु झालेल्या कमी अधिक प्रभावाने संततधार पावसाने नागरिकांची रात्रीची झोप उडविली असून तालुक्यातील वेताळवाडी पाठोपाठ गुरुवारी(दि.३०) रात्री अकरा वाजता जरंडी(धिंगापूर) आणि बनोटी धरण ओव्हरफलो झाली असून गोंदेगाव धरण एकाच रात्रीत भरले आहे.दरम्यान झालेल्या पावसाने सोयगाव-बनोटी रस्त्यावर दाणादाण उडवून सोयगाव जवळील गवळण नाल्याच्या अर्धवट अवस्थेत असलेल्या पूल पाण्याखाली बुडाला दुसरा एक पूल पाण्यात बुडाला तर जरंडी गावाजवळील नवीन पुलाचा वळण रस्ता व घोसला गावातील खटकाली पुल चा वळण रस्ता पुरात वाहून गेल्याने सोयगाव-बनोटी-चाळीसगाव या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती दरम्यान सोयगाव-बनोटी-चाळीसगाव रस्ता धोक्याचा झाला असून बनोटी,गोंदेगाव वरुन नागरिकांना पाचोरा मार्गे सोयगाव येण्याची वेळ आली आहे.सोयगाव-बनोटी रस्त्यावर दोन पूल वाहून गेले असून दोन पूल पाण्याखाली आहे त्यामुळे या रस्त्याची पावसाने वाट लावली आहे.त्यामुळे जरंडी आणि घोसला गावाजवळील पुलाचे वळण रस्ते वाहून गेले आहे.दरम्यान गुरुवारी रात्री सोयगाव मंडळात १५० मी जरंडी मंडळात-१५० मी मी बनोटी मंडळात ४५ मी मी सावळदबारा मंडळात ९५ मी मी पावसाची नोंद झाली असून शुक्रवारी दुपारी एक वाजेपर्यंत पाऊस सुरु च होता. 

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90