कन्नड तालुका प्रतिनिधी : कन्नड तालुक्यातील अंधानेर–मुंडवाडी हा महत्त्वाचा संपर्क रस्ता सध्या अत्यंत दुरवस्थेत असून वाहनचालक, शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवास धोकादायक बनला आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून