header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

मोदी सरकारच्या १२ वर्षांनिमित्त भाजपा जालना महानगरची नियोजन बैठक

https://hinduprakashwarta.com/wp-content/uploads/2026/06/1002421867-1.jpg

 ‘एक झाड आईच्या नावाने’ अभियानांतर्गत वृक्षारोपण

जालना (प्रतिनिधी) : केंद्रातील मोदी सरकारच्या यशस्वी १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त राबविण्यात येत असलेल्या “विश्वास, विकास व जनकल्याण” अभियानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी जालना महानगर जिल्ह्याच्या वतीने जिल्हा नियोजन बैठकीचे आयोजन भाजपा जिल्हा कार्यालयात करण्यात आले. आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध जनसंपर्क व सामाजिक उपक्रमांचे नियोजन या बैठकीत करण्यात आले. प्रदेश संयोजक डॉ. भागवत कराड व मराठवाडा विभाग संयोजक नितीन काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत बोलताना डॉ. भागवत कराड यांनी मोदी सरकारच्या गेल्या १२ वर्षांतील विकासकामांचा आढावा घेतला. पायाभूत सुविधा, गरीब कल्याण, महिला सक्षमीकरण, शेतकरी हित, सामाजिक न्याय आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक सक्रिय होण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी सांगितले की, मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त जालना महानगर जिल्ह्यात विविध जनसंपर्क कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या विकासकामांची व जनकल्याणकारी योजनांची माहिती घराघरांत पोहोचविण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रियपणे सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बैठकीनंतर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत “एक झाड आईच्या नावाने” या अभियानांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग नोंदवून पर्यावरण रक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित केली.

बैठकीस महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, रामेश्वर भांदरगे, विजय कामड, सोपान पेंढारकर, युवानेते अक्षय गोरंटयाल, नारायण पवार, जिल्हा सरचिटणीस सुनील पवार, वसंत शिंदे, शिवप्रकाश चितळकर यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90