छत्रपती संभाजीनगर: श्रीमंत,किर्तीवंत,राजसिहासनाधिष्ठित छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या
शहारातील ऐतिहासिक घडामोडींचा शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त क्रांतीचौकात मोठा उत्साह दिसून आला.
या नयनरम्य सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते करवीरनगरी कोल्हापुरातील चाणक्य मर्दानी खेळ ,सांस्कृतिक संघाच्या 17 कलाकारांनी हलकीच्या तालावर लाठी,पट्टा,पाना,भाला, शिवकाशिद यांच्या प्रसिद्ध विटा व तलवारबाजीचे दाखवलेले प्रात्यक्षिक!हा सोहळा
मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी व शिवप्रेमींनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी क्रांती चौक परिसर दणाणून गेला.
शहराच्या विविध भागांतही छत्रपती शिवरायांना शिवप्रेमींकडून अभिवादन करण्यात आले. क्रांती चौकात शिवराज्याभिषेक सोहळ्याला सकाळी साडेआठ वाजता सुरुवात झाली. प्रथम क्रांती चौकात प्रदक्षिणा घालून शिवरायांची पालखी आणण्यात आली. उबाठाचे शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांच्या धर्मरक्षक प्रतिष्ठानच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवरायांचा आसनस्थ पुतळा व आकर्षक देखावा उभारण्यात आला होता. येथे ही पालखी ठेवली.
पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला. यानंतर विविध मान्यवरांनी शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी महिलांसह युवक-युवतींचीही मोठी उपस्थिती होती. तसेच चौकाच्या दुसऱ्या बाजुला जालनाकर ग्रूप व मोरे परिवार आणि जय शिवाजी राजे मित्र मंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. येथे दिवसभरात अनेक शिवप्रेमींनी रक्तदान करून शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी गणेश महासंघ व शिवजयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराजभाऊ पवार,
माजी खासदार चंद्रकांत खैरे, आ. अंबादास दानवे, बाळासाहेब थोरात, संतोष जेजूरकर, संदीप शेळके, इब्राहिम खान पठाण,उदय डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या मान्यवरांची उपस्थिती
क्रांती चौकात सकाळी पालकमंत्री संजय शिरसाट, खा. डाॅ. कल्याण काळे, महापौर समीर राजूरकर, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र दाते पाटील, किशोर चव्हाण, सुरेश वाकडे, नगरसेवक सचिन खैरे, महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिवरायांना अभिवादन केले.
भगव्या पताकांनी उजळले क्रांती चौक
शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त लावलेल्या भगव्या पताकांनी क्रांती चौक परिसर उजळून निघाला. सकाळी काही शिवप्रेमींनी शिवकालीन मैदानी खेळांचे प्रात्यक्षिक केले. यावेळी आ. अंबादास दानवे यांनी दांडपट्टा चालवला, तसेच तलवारबाजीचेही प्रात्यक्षिक केले. शिवप्रेमींच्या उत्साह आणि घोषणाबाजीने परिसरात चेतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.