फुलंब्री प्रतिनिधी :16
पंचायत समिती फुलंब्रीच्या उपसभापती तथा जनआरोग्य समिती सदस्या सौ. अश्विनीताई अजिनाथ सोनवणे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, आळंद येथे भेट देऊन आरोग्य सेवांची सविस्तर पाहणी केली. यावेळी रुग्णांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधा, स्वच्छता व्यवस्था, औषधांचा साठा तसेच आरोग्य सेवेच्या गुणवत्तेचा आढावा घेण्यात आला.
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार, तत्पर व प्रभावी आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी सौ. सोनवणे यांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तसेच आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांच्या अडचणी जाणून घेत त्यांच्या निराकरणाबाबत चर्चा केली.
या पाहणी दौऱ्यात सादिक कारी, समीर पठाण, अजम शेख, भरत गौरे, फईम शेख व कृष्णा सोनवणे उपस्थित होते.
यावेळी प्रथम वैद्यकीय अधिकारी डॉ. शर्वरी मगरकर, द्वितीय वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी राजपूत, आरोग्य सहाय्यक श्री. रविंद्र पंडित व आरोग्य सहाय्यिका श्रीमती तेजवंती सोनवणे यांनी आरोग्य केंद्रातील विविध सेवांची माहिती दिली.