JSW, Toyota, Ather आणि Endurance प्रकल्पांना भेट; गुंतवणूक व रोजगारनिर्मितीवर भर
छत्रपती संभाजीनगर : मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या विकास व विश्वास पर्वानिमित्त केंद्रीय राज्यमंत्री सौ. निमुबेन बांभाणिया यांनी मंगळवारी बिडकीन येथील वेगाने विकसित होत असलेल्या औद्योगिक क्षेत्राला भेट देत JSW, Toyota, Ather आणि Endurance या प्रमुख प्रकल्पांच्या कामकाजाचा आढावा घेतला.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष किशोर शितोळे, नगरसेवक रामेश्वर भादवे, सौ. छाया खाजेकर, माजी नगरसेवक दिलीप थोरात तसेच मंडळ अध्यक्ष निखिल महाले उपस्थित होते. संबंधित प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांनी उद्योगांच्या उभारणीची सद्यस्थिती, उत्पादन क्षमता, भविष्यातील विस्तार आणि स्थानिक युवकांसाठी उपलब्ध होणाऱ्या रोजगार संधींची माहिती दिली.
बिडकीन परिसर मराठवाड्याच्या औद्योगिक नकाशावर वेगाने उदयास येत असून केंद्र सरकारच्या उद्योगपूरक धोरणांमुळे मोठ्या गुंतवणुकीला चालना मिळत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. या भेटीद्वारे औद्योगिक विकासाला गती देतानाच स्थानिक रोजगारनिर्मिती आणि आर्थिक प्रगतीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला.