vitthal mamtabade जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने (JNPA)उरण तालुक्यातील रांजनपाडा जासई (सेक्टर-११) येथील रहिवासी वापरासाठी आरक्षित असलेली तब्बल ५१.७४ एकर (२०.९४ हेक्टर) जमीन औद्योगिक क्षेत्रात बदलण्याचा घाट घातला आहे. प्रशासनाच्या या मनमानी आणि अन्यायकारक प्रस्तावाविरोधात स्थानिक भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त आणि ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाले असून उरणमध्ये पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे.